सुपरफास्ट

विद्येच्या माहेरघरात मध्यरात्री भीषण अपघात; नऊ जणांना चिरडले

विद्येचा माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून पुण्याच्या वाघोली जवळ भीषण अपघात झाला आहे भरधाव वेगात आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कसा झाला अपघात

– डंपर चालक क्रमांक MH 12 VF 0437 याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे.अपघातामध्ये एकूण तीन जण जागीच मृत पावले असून इतर सहा जण जखमी आहेत.

1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत

तर

1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे

अशी जखमींची नावे असून जखमींवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत