sharad pawar

राज्य सरकारनं आणलेलं वाईन विक्रीचं धोरण हा उत्तम निर्णय होता -शरद पवार

160 0

पुणे:प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही,
आज आपण दोन वर्षानंतर भेटतोय. या दरम्यान अनेक संकटं आली. यात द्राक्ष बागायतदारांना मोठी किंमत मोजावी लागली. गेली दोन वर्षे द्राक्ष निर्यातीला बंदी आली. अशात चीनने निर्यातीच्या नियमात अटी टाकल्या. त्यानंतर ज्या मर्यादा आल्या. त्यामुळं द्राक्ष शेतकऱ्यांचं नुकसान झाले. मागील राज्य सरकारनं आणलेलं वाईन विक्रीचं धोरण हा उत्तम निर्णय होता. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

आज महाराष्ट्र राज्य बागायतदार वार्षिक संघाचा मेळावा पुण्यात वाकड ते पार पडला .त्यावेळी
केंद्रीय कृषिमंत्री कैलास चौधरी, भारतीय कृषी महासंघाचे महासंचालक हिमांशू पाठकसो, महाराष्ट्र राज्य बागातदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, द्राक्ष संघाची 1907 साली स्थापना झाली होती. बारामती आणि फलटण भागातील एक शेतकरी होते. त्यांनी शास्त्रशुद्ध दृष्टिकोन ठेवत पुढाकार घेत, द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना केल्याचे पवार म्हणाले. शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. 35 हजारांहून अधिकचे शेतकरी या संघटनेत लक्ष घालतात. त्यामुळेच आता ही शेती मर्यादित भागापूरती मार्यदित राहिलेली नाही.

ती राज्याच्या विविध भागात विस्तारलेली असल्याचे शरद पवार म्हणाले.
देशातून 8 टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर 92 टक्के द्राक्षाची भारतीय बाजारपेठेत विक्री केली जाते. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेत कशी मजबूत होईल, आर्थिक उलाढाल मोठी होईल याकडं लक्ष द्यायला हवं. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आपण बोलणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार म्हणाले,शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या हा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिलं नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. असे शरद पवार म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!