हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची; धर्मवीर मधील राज ठाकरे आनंद दिघेंच्या भेटीचा सीन व्हायरल

366 0

आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा १३ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य, न्यायप्रणाली प्रेक्षकांसमोर आणण्यात आली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यानं साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनसे रीपोर्ट या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करण्यात आला आहे. यात आनंद दिघे हे रुग्णालयात असल्याचे दिसत असून राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. हाच फोटो शेअर करत “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे- धर्मवीर. धर्मवीर आनंद दिघे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्यातील हॉस्पिटल मधील शेवटचा संवाद”, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!