महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर;

महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर; 5 डिसेंबरला कोण कोण घेणार मंत्रीपदाची शपथ ?

429 0

महाराष्ट्रातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच डिसेंबरला पार पडणार आहे. शपथविधीसाठी अवघे दोन दिवस बाकी असूनही मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याच नेत्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र आता तिन्ही पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. या संभाव्य यादीनुसार कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, वाचा सविस्तर.

भाजपाची संभाव्य यादी

1. देवेंद्र फडणवीस
2. चंद्रकांत पाटील
3. सुधीर मुनगंटीवार
4. राधाकृष्ण पाटील
5. नितेश राणे
6. आशिष शेलार
7. ॲड राहुल नार्वेकर
8. रविंद्र चव्हाण
9. संजय कुटे
10. मंगल प्रभात लोढा
11. अतुल भातखळकर
12. पंकजा मुंडे
13. देवयानी फरांदे
14. गोपीचंद पडळकर
15. राम शिंदे
16. माधुरी मिसाळ
17. शिवेंद्रराजे भोसले
18. गिरिश महाजन
19. अतुल सावे
20. मोनिका राजळे
21. जयकुमार रावल
22. अभिमन्यू पवार
23. विजयकुमार देशमुख
24. रवी राणा
25. संतोष दानवे

शिवसेनेच्या मंत्र्यांची संभाव्य यादी

1. एकनाथ शिंदे
2. शंभूराजे देसाई
3. उदय सामंत
4. भरत गोगावले
5. संजय शिरसाट
6. हेमंत पाटील
7. गुलाबराव पाटील
8. दिपक केसरकर
9. दादा भुसे
10. तानाजी सावंत
11. मनिषा कायंदे
12. प्रकाश आबिटकर
13. राजेश क्षीरसागर

राष्ट्रवादी संभाव्य यादी

1. अजित पवार
2. छगन भुजबळ
3. अदिती तटकरे
4. धनंजय मुंडे
5. दत्ता भरणे
6. नरहरी झिरवळ
7. संजय बनसोडे
8. अनिल भाईदास पाटील
9. इंद्रनिल नाईक

या नेत्यांची नावं सध्या मंत्री पदासाठी चर्चेत आहेत. मात्र पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीत केवळ बारा ते पंधरा मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या या संभाव्य यादीतून काही मोजक्या नेत्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडेल. त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारा इतर नेत्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत माहिती महायुतीकडून लवकरच जाहीर केली जाईल.

Share This News
error: Content is protected !!