Sanjay Raut

अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”, समृद्धीवरील अपघातावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

3612 0

बुलढाणा:बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी बसला आग लागून २६ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला.या अपघातावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्ग हा शापित झाला आहे असून, २६ प्रवाशांचा होरपळून मुत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे. आजचा अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. हा अपघात का झाला यांच्या खोलात जावं लागेल ,असेही संजय राऊत म्हणाले.

समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतले. त्या सर्व गोष्टी तपासने गरजेचे आहे. दुर्दैवाने या महामार्गावर जे अपघात घडत आहेत. लोकं मृत्यूमुखी पडत आहेत. हे चांगले नाही असे राऊत म्हणाले.

समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने तयार झाला असून, वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली आहे. पण त्यासंदर्भात काहीही होतांना दिसत नाही. समृद्धी महामार्गासाठी अनेकांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू मला त्या रस्त्यामध्ये दिसतात. म्हणून तर महामार्गावर अपघात होत नाहीत ना? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!