भिडे पुलाखाली राहणाऱ्या मजुरांचा राडा; दारूच्या नशेत दुसऱ्या मजुराच्या डोक्यात घातली फरशी

331 0

दारू पिताना झालेल्या वादातून एका मजुराने दुसरा मजुराची डोक्यात फरशी मारून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना पुण्यातील भिडे पुलाजवळ घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून विश्रामबाग पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृत्युंजय शंकर सिंग (वय 29, सध्या रा. भिडे पुलाजवळ, नारायण पेठ) असे गंभीर जखमी झालेल्या मजुराचं नाव असून याप्रकरणी अश्विन यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मृत्युंजय सिंग याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नारायण पेठ, डेक्कन परिसरात असलेल्या भिडे पुलाजवळ पुण्यातील मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचा पूल बांधण्यासाठी या ठिकाणी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. याच पुलाच्या परिसरात पीडित आणि आरोपी मजूर राहतात. दोघेही पत्रांच्या खोलीत राहून मजूर काम करतात. दोन दिवसांपूर्वी काम संपवल्यानंतर या दोघांनी एकत्र दारू प्यायली. त्यानंतर जेवण झाल्यानंतर त्यांच्यात मोठे वाद झाले. याच वादाच्या रागातून यादव याने मृत्युंजय सिंग यांच्या डोक्यात मोठी फरशी मारली. ज्यामध्ये फिर्यादी सिंग हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटना घडल्यानंतर आरोपी यादव हा घटनास्थळावरून पसारा झाला. गंभीर जखमी झालेल्या सिंग याने पोलिसात तक्रार दाखल केली. तर विश्रामबाग पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या कलमांतर्गत यादव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!