अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, CISF जवानांनी वाचवले प्राण (व्हिडिओ)

535 0

नवी दिल्ली- दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे CISF जवानांनी प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आली आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

ही तरुणी आज सकाळी अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या उंच इमारतीवर चढली. ते पहाताच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी तिला खाली उतरण्याची विनंती केली. CISF जवानांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

त्याचवेळी इमारतीच्या खाली CISF जवान मोठ्या कापडाची झोळी करून उभे राहिले. क्षणार्धात या तरुणीने आपले शरीर खाली लोटून दिले. ते पाहून सर्वांच्या काळजात धस्स झाले. परंतु खाली उभ्या असलेल्या CISF जवानांनी तिला त्या झोळीत अलगद झेलल्यामुळे तिचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!