Maharashtra Public Service Commission

राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारीसाठी विद्यार्थांना पुरेसा वेळ द्या ! शरद पवार यांची एक्सवर पोस्ट

2596 0

राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी: मुंबई: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या तयारीसाठी विद्यार्थांना पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी राज्यसरकारला केली आहे. (राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी)

MPSC विद्यार्थ्यांनी आज (15 एप्रिल) पुन्हा शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांकडून जागा वाढी संदर्भात सरकारने निर्णय करावा, अशी देखील शरद पवारांकडे मागणी केली. संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जागा वाढवाव्या. आणि राज्य सेवा मुख्य परीक्षेत तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात. अशी आमची मागणी असल्याची माहिती MPSC विद्यार्थी सोमनाथ चव्हाण याने दिली आहे. या मागणीसाठी सोमवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यासंदर्भात शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करून ही मागणी केली आहे.

TOP NEWS MARATHI LIVE : कासले झुकले ! बीड पोलिस ठाण्यात शरण यायला निघाले…रणजीत कासले LIVE

याबाबत मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधणार असल्याची माहिती शरद पवार यांनी पोस्टमध्ये दिली आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर होणाऱ्या
या परीक्षेत वयवाढीच्या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची जाहिरात तुटपुंजी असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी आपण आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो आहे. आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. मात्र, ही बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही.

ही बैठक झाल्यावर विद्यार्थ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेना-मनसे एकत्र येणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

Share This News
error: Content is protected !!