गायक स्वप्नील बांदोडकर यांचं “सांग प्रिये” रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

563 0

गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं आता ‘सांग प्रिये’ या नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज दिला आहे.

कोमल खिलारे आणि सोहम चांदवडकर  ही नवी जोडी त्यात झळकली असून, सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना या गाण्याचा आस्वाद घेता येईल. कोमल ही डाॅक्टर तर सोहम हा पायलट असून दोघेही प्रसिद्ध माॅडेल आहेत. साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष आणि सप्तसूर म्युझिकने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लीना कुलकर्णी यांनी गीतलेखन केलं आहे, तर अमेय मुळे यांनी संगीत रचना, निखील श्रीधर यांनी संगीत निर्मिती केली आहे.

आजवर स्वप्नील बांदोडकरनं अनेक हिट गाणी गायलेली आहेत. प्रेमगीत ही स्वप्नीलची खासियत आहे. त्यामुळे स्वप्नील तरुण-तरुणींचा लाडका गायक आहे. सांग प्रिये हा म्युझिक अल्बमही प्रेमगीतच असल्यानं स्वप्नीलनं अतिशय उत्तमरीत्या हे गाणं गायलं आहे.

Share This News
error: Content is protected !!