शाहरुखचं कमबॅक, बॉलिवूडला अच्छे दिन

785 0

अभिनेता शाहरुखच्या पठाणचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून चाहत्यांनी पठाण इतका डोक्यावर घेतला की रिलीज झाल्यानंतर थिएटरबाहेरचा जल्लोष एखाद्या उत्सवासारखा होता.

या चित्रपटानं पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. इतकंच काय तर चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार दुपारपर्यंत चित्रपटानं पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपॉलिसमध्ये एकूण 20.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटानं 25 कोटींची कमाई केली आहे. तर पठाणनं पहिल्याच दिवशी मल्टिप्लेक्समध्ये इतकी कमाई करत KGF 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. KGF 2 नं पहिल्या दिवशी 22.15 कोटी कमावले होते. तर एक्सपर्ट्सप्रमाणे ‘पठाण’ ओपनिंग डेला 50 कोटींच्या जवळपास कलेक्शन करेल. KGF 2 पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली होती. तर पठाण हा सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!