Sangli crime news :सांगली शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जीवे मारण्याची धमकी दिले असता याचाच राग मनात ठेवून धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली आहे. (Sangli crime news)
समीर नदाफ ( वय ४१ , रा. खारे मळा, कुपवाड) नाव असून त्याचा धारदार शस्त्राने खून करण्याचा प्रकार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला होता. ही घटना काल रात्री औद्योगिक वसाहत ते सावळी रस्त्यावर रस्ते परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ घडली. या घटने प्रकरणी खून करणाऱ्या दोन संशयितांना २४ तासांत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी गजाआड केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी केले. (Sangli crime news)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
समीर नदाफ याचा पोलिस दप्तरी गुन्हेगारी म्हणून नोंद आहे. खूनप्रकरणी सोहेल सलीम काझी ( वय ३०, रा, खारे मळा) आणि सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम (वय २६ रा. बडेपीर कॉलनी, मिरज रोज) या दोघा संशयितांना पोलिसांनी आज अटक केले.
या घटने बाबत माहिती देताना निरीक्षक शिंदे यांनी सांगितले की, संशयितांनी समीर याला दारू पिण्यासाठी बोलावून घेतले होते. यादरम्यान दारू पिताना त्याच्यासोबत वाद केले. या वादात समीर याच्या छातीवर, पोटावर, डोकीत धारदार शस्त्राने वार केले. आणि आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेची कुपवाड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी नदाफ याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (Sangli crime news)
संशयित आरोपी काझी याची पानपट्टी असून मृत नदाफ हा कायम पानपट्टीवर जात असत. मात्र पैसे न देताच जात होता. काझी याने पैसे मागितल्यास दमदाटी करत असे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देत. याचाच राग काझीच्या मनात होता. काल रात्री पाण्याच्या टाकीजवळ काझी व मुकादम उभे असता नदाफ याने दारूसाठी पैशाची मागणी केली. (Sangli crime news)
परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केला. या प्रकरणी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.