शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचा आज निकाल

592 0

आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे.हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचा निकाल जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.

मतदारसंघनिहाय झालेले मतदान

कोकण शिक्षक – ९१.०२ टक्के

औरंगाबाद शिक्षक – ८६ टक्के

नागपूर शिक्षक – ८६.२३ टक्के

नाशिक पदवीधर – ४९.२८ टक्के

अमरावती पदवीधर – ४९. ६७ टक्के

  • अशी होणार मतमोजणी 
  • विधान परिषद निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत हे निश्चित करण्यात येईल.
  • त्यानुसार पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळाल्यास उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल.
  • पहिल्या पसंतीची आवश्यक मते कोणत्याच उमेदवाराला मिळाली नाहीत तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.
  • या उलट्या क्रमाने उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात येतील.
  • सर्व मतांची मोजणी झाल्यानंतरही पुन्हा आवश्यक मते मिळाली नाहीत तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.
Share This News
error: Content is protected !!