PUNE PORSCHE CASE UPDATE पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना बाल न्याय मंडळाकडून मोठा धक्का बसला आहे.
अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करणारी पोलिसांची याचिका, बाल न्याय मंडळाने फेटाळली असून,
आरोपीवर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवण्यात येणार आहे..
VIDEO NEWS: पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींवर अल्पवयीन म्हणूनच खटला चालणार
19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्श कारने दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना धडक दिली.
यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया दोन इंजिनियर तरुण-तरुणी जागीच मृत्युमुखी पडले.
अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा आरोपी 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता.
सुरुवातीला पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु जेव्हा आरोपी दारू पिऊन असल्याचे उघडकीस आले
तेव्हा प्रकरण गंभीर झाले. सुरुवातीला, बाल न्याय मंडळाने (जेजेबी) अवघ्या 14 तासांत आरोपीला 100 शब्दांचा निबंध, ‘समाजसेवा’ आणि ‘अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे’
अशा अटी घालून जामीन मंजूर केला होता. यामुळे देशभरात संताप आणि संतापाची लाट उसळली होती.
त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती बाल न्याय मंडळाकडे केली होती
कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.सरकारी वकिलांकडून आरोपी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. आरोपी 17 वर्षीय मुलगा मद्यधुंद अवस्थेत पोर्शे चालवत असल्याचे स्पष्ट झाले होते.
प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, अशी मागणी सरकारी बाजूने करण्यात आली होती.
या प्रकरणावर बाल न्याय मंडळ (JJB) आपला निर्णय दिला असून ही मागणी फेटाळून लावली आहे. या बाबतीत सरकारी वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.