आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं

‘मी नपुंसक आहे, तू माझ्या मित्राबरोबर संबंध ठेव’; हैवान पतीने पत्नीवर केली जबरदस्ती

654 0

स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी काहीही करून मुल जन्माला घालायचं, या अट्टाहासापोटी एका पतीने मित्राला आपल्याच पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. पुण्यातील महिला बरोबर ही घटना तिच्या सासरी घडली. नेमकं हे प्रकरण काय आणि उघडकीस कसं आलं ? पाहूया…

पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, तिचा पती तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्याचबरोबर त्याचा मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने मित्राला घरी बोलावलं होतं. या मित्राने एकांताचा फायदा घेत महिलेचा विनयभंग केला आणि एकांतात गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न केला, परंतु तिने त्याला विरोध केला. पती आणि त्याच्या मित्राकडून होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवून खडक पोलीस स्टेशन गाठले.

Share This News
error: Content is protected !!