PUNE FAKE COURT ORDER CASE: बनावट आदेश आदेश पत्रांच्या आधारे जामीन मिळवणाऱ्याला पुणे पोलिसांचा दणका; या कलमांतर्गत गुन्हा दाखल

517 0

पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायव्यवस्थेचे धिंडवले काढल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आरोपींनी न्यायालयात बनावट आदेश पत्र दाखवून उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवला होता. या आदेश पत्रावर न्यायाधीशांची सही व शिक्का देखील होता. दरम्यान हा प्रकार पीडिताच्या वकिलांनी निदर्शनास आणला होता. याच प्रकरणात आता पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. बनावट आदेश पत्र ( Pune fake court order case बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पुण्यातील कंपनी सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वीज उपकेंद्रासाठी फायर फायटिंग सिस्टम तयार केले. त्याचे त्यांना पेटंट मिळाले. कंपनीच्या दाव्यानुसार भारतात अशा प्रकारची यंत्रणा फक्त सीटीआर कंपनी बनवते. मात्र असे असतानाही चेन्नई येथील इसन एमआर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने सीटीआर कंपनीच्या या फायर फायटिंग सिस्टिमचे डिझाईन कॉपी केले. ही बाब सीटीआर कंपनीच्या व्यवस्थापनाला कळताच पुणे येथील विमान नगर पोलीस ठाण्यात चेन्नई येथील इसन एमआर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उच्चस्पद अधिकारी रविकुमार रामास्वामी, हरिभाऊ चिमटे यांच्यासह एकूण पाच जणांवर विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटकही केली.

त्यानंतर या प्रकरणातील आरोपी हरिभाऊ चिमटे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली, मात्र त्याला सत्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. त्यानंतर त्याने बनावट आदेश पत्र बनवून मुंबई उच्च न्यायालया मधून जामीन मिळवला. याबाबत तक्रारदारांच्या वकिलांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बनावट आदेश पत्राचे प्रकरण समोर आले. आरोपी हरिभाऊ चिमटे याने बनावट आरोप पत्रासह न्यायाधीशांचे शिक्के आणि सही देखील खोटी केली होती. याविषयी आरोपींचा जामीन रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सूचना कोर्टाने दिली होती. त्या अनुषंगाने आता पुणे पोलिसांनी पाऊले उचलली आहेत.

हरिभाऊ चेमटेविरुद्धचे नवे खटले

कलम 337 – सार्वजनिक नोंदी आणि कागदपत्रांची बनावटगिरी

कलम 339 – बनावट कागदपत्र बाळगणे आणि ते खरे म्हणून वापरणे याचा गुन्हा

कलम 246 – न्यायालयात खोटा दावा करून फसवणूक

कलम 318 – फसवणूक

Share This News
error: Content is protected !!