पुणे, दि.६: भारत हा युवकांचा देश असून या युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन तसेच त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५- २६ चे ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आबेदा इनामदार कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे मंगळवारी (दि. ४ ) उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील व दिग्दर्शक व अभिनेते डॉ. राहुल बळवंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्री. पाटील म्हणाले, जगातील विविध देशामध्ये युवांची संख्या कमी होत आहे त्यामुळे भारतातमधून कौशल्य असणा-या युवांची मागणी मोठया प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर आपल्यात असणारे एआयचा वापर करून आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा विकसित करण्यात यावे. भविष्यात भारतातील युवकांचे कौशल्याचा उपयोग इतर देशांना होवू शकतो, असे श्री. पाटील म्हणाले.
श्री. लकडे म्हणाले, विजेते स्पर्धक पुढे विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील आणि आपल्यातील पूर्ण क्षमतानुसार आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यात यावे अशी कलाकार स्पर्धकांकडून श्री. लकडे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. बळवंत म्हणाले, युवा महोत्सवाचा उपयोग युवकांना आपल्या कला सादरीकरणासाठी चांगल्या पध्दतीने होईल.युवकांनी आपल्या मधील कलाकाराला जन माणसामध्ये सादरीकरण करण्यास पुढे यावे हा युवा महोत्सव तरुणाईच्या कला, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरेल असे डॉ. बळवंत म्हणाले.
*महोत्सवाला युवकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद*
या महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत,कथालेखन,चित्रकला,वकृत्व,कविता लेखन,नव उपक्रम ( विज्ञान प्रदर्शन ) इत्यादी बाबींमध्ये वयोगट 15 ते 29 वयोगटातील एकूण १९२ युवक व युवतीनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील युवक-युवतींनी सांस्कृतिक, साहित्यिक व कौशल्य विकास विषयक सात स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. जिल्हास्तरावरील युवा महोत्सव विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्राविण्य प्राप्त प्रथम व व्दितीय विजेते संघ पुढील विभाग व राज्यस्तरीय कार्यक्रमात भाग घेतील.
यावेळी क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते,अश्विनी हत्तरगे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ.आफताव अन्वर शेख, प्राचार्य चाफईस कॉलेज व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, ताहीर आसी (अध्यक्ष, राष्ट्रीय एकात्मता संघटना प्राचार्य, आबेदा इनामदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोशन आरा शेख मेरा युवा भारत जिल्हा समन्वयक श्री. शेटे आणि चव्हाण आदी उपस्थित होते.