आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं

VISHRAMBAGH POLICE PSI CASE: रजिस्टर मॅरेज, गर्भपात, जातीवाचक शिव्या आणि “प्रेमाचा दि एन्ड” ‘पीएसआय’ने पत्नीचा केला छळ

1656 0

VISHRAMBAGH POLICE PSI CASE कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनल्याची अनेक प्रकरणात दररोज समोर येत आहेत. अशातच पुण्यातून एक गंभीर घटना समोर आली असून चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाने प्रेमाचं आमिष दाखवून, रजिस्टर मॅरेज करून, पत्नीला गर्भपात करायला सांगत गर्भपाता नंतर तिचा स्वीकार करायलाच नकार दिलाय. हा प्रकार पुण्यात घडला आहेत.

या प्रकरणी पीडित तरुणीने पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार (VISHRAMBAGH POLICE PSI CASE) दाखल केली आहे. आरोपी तरुण आणि फिर्यादीची 2020 मध्ये पुण्यात ओळख झाली. यावेळी आरोपी पोलीस भरतीची तयारी करत होता. या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी स्वइच्छेने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. अर्थात त्यावेळी हे लग्न दोघांनीही कुटुंबीयांपासून आणि मित्रांपासून लपवून ठेवलं. नोकरी लागल्यानंतर आपण आपल्या घरी सांगूया असे आरोपीने तरुणीला सांगितलं होतं. मात्र तरुणीच्या प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने थोडे थोडे करून तिच्याकडून दहा ते बारा लाख रुपये उकळले. वेळोवेळी तिच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनही तरुणी गर्भवती राहिली.

जातिवाचक शिव्या देत पत्नीचा स्वीकार करायला नकार; पीएसआय विरोधात गुन्हा

त्यावर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. पुढे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत आरोपीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यानंतर आपल्याला पत्नीचा दर्जा द्यावा यासाठी फिर्यादी तरुणीने हट्ट धरला. मात्र त्यावेळी ‘तू खालच्या जातीची आहेस, तुला माझे कुटुंबीय एक्सेप्ट करणार नाहीत. आपला विवाह त्यांना मान्य नाही, माझा विचार आणि हे प्रकरण सोडून दे’, असं म्हणत तरुणीला स्वीकारायला नकार दिला. त्यानंतर अखेर हतबल झालेल्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुख्य आरोपी असलेल्या विराज गावडे यांच्यासह त्याचा भाऊ कुणाल आणि वडील गजानन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विराज गावडे यांनी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक रित्या फिर्यादी तरुणीचा छळ केला.

एवढेच काय तर या तरुणीला तिच्या वडिलांच्या जागेवर चंद्रपूर मध्ये नोकरी लागणार होती. ती नोकरीही विराजच्या सांगण्यावरून तिने नाकारली. त्यामुळे आज तिच्याकडे नोकरीही नाही आणि ज्याच्यावर प्रेम केलं तो विराजही नाही. त्यामुळेच कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच हा मोठा गुन्हा केल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी

Chandrashekhar Bawankule: योजना चालवण्यासाठी थोडा निधी घेतल्यास हरकत नाही

अश्लील भाषा, कंटेंट, आणि इंटीमेट पोझ; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला HOUSE ARREST SHOW नेमका काय ?

Share This News
error: Content is protected !!