अटकेच्या भीतीने पूजा खेडकरचं पलायन? दुबईला पसार झाल्याच्या जोरदार चर्चा

970 0

 

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा दिल्लीच्या पटीयाला न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर ला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे..

यूपीएससी मध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला होता यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे. दिल्ली पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर ला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आणि याच अटकेच्या भीतीने पूजा खेडकरनं पलायन केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात

पूजा खेडकरला कोणत्या क्षणी अटक होणार? अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयानं काय म्हटलं

Share This News
error: Content is protected !!