PCMC MISSING GIRL VAISHNAVI INGAVALE: अंडरवॉटर कॅमेऱ्यामुळे सापडला विहिरीत अडकलेला तरुणीचा मृतदेह

79 0

PCMC MISSING GIRL VAISHNAVI INGAVALE: घरातून अचानक बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय तरुणीचा मृतदेह चक्क 50 फूट खोल विहिरीत आढळल्याची घटना पिंपरी परिसरात घडली आहे. हा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दलाने अंडरवॉटर कॅमेऱ्यांचा वापर केला. आणि अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलाय. मात्र या तरुणीने आत्महत्या केली, तिची हत्या झाली की हा केवळ अपघात (PCMC MISSING GIRL VAISHNAVI INGAVALE) आहे ? हा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झालाय

Shaktipeeth Expressway Controversy:शेतकरी पेटलेत…तरी सरकार मात्र ‘शक्तिपीठ’साठी पेटून उठलंय!

पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात राहणारी वैष्णवी इंगवले ही 18 वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली. तिच्या वडलांनी दिघी पोलीस ठाण्यात वैष्णवी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवी चा तपास सुरू केला. वैष्णवी ज्या ठिकाणाहून वैष्णवी बेपत्ता झाली तिथे शोधाशोध करत असताना जवळच एक विहीर आढळून आली. या विहिरीच्या काठावर एक ओढणी सापडली. जी ओढणी वैष्णवीची असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरून वैष्णवीला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काहीही आढळून आलं नाही. या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने जवानांना तळापर्यंत पोहोचता येत नव्हतं. त्यामुळे अखेर विहिरीमध्ये 45 फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा टाकण्यात आला. या कॅमेरामध्ये तरुणीचे पाय दिसले. त्यावरून विहिरीतील गाळ काढत शोध घेतला असता वैष्णवीचा मृतदेह अग्निशमन दलाचा हाती (PCMC MISSING GIRL VAISHNAVI INGAVALE) लागला. हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र या मृतदेहामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वैष्णवीनं आत्महत्या केली, तिची हत्या झाली ती वैष्णवीचं विहिरीत पडणं हा केव्हा अपघात होता ? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत.

TOP NEWS MARATHI : हिंदी भाषा सक्ती, शक्तिपीठ महामार्ग वाद ते ठाकरे बंधूंचं मनोमिलन उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

विहिरीच्या ४५ खोल फूट तळाशी वैष्णवी इंगवलेचा मृतदेह आढळून आला. वैष्णवीच्या अशा एकाएकी जाण्याने तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मात्र वैष्णवीचा मृत्यू ही हत्या, आत्महत्या की अपघात याबाबत दिघी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!