भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कुख्यात गुंड गजा मारणे (GAJA MARANE) हा पोलिसांसमोर हजर झाला होता. आता या प्रकरणी गजा मारणेला 3 मार्च पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी विचारला होता. सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशारा पुणे पोलिसांना दिला होता.
गजा मारणे हा कोथरूड पोलिस स्टेशनला हजर झाला असून, पोलिसांनी गजा मारणे याला फरशीवर खाली बसवले आहे.