Raj Thackery

सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो – राज ठाकरे

3740 0

सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते. ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असते, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

राज्यात पत्रकारिता अजुनही जिवंत आहे. असे असले तरी अनेकांना घरी बसून काही कामे नसतात. मागचा पुढचा इतिहास माहिती नसतो. काही लोकं राजकीय पक्षांनी पाळलेली असतात. त्यांना लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा त्रास करुन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, ते लिहिण्याची सध्या गरज आहे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.

Share This News
error: Content is protected !!