शरद पवारांचे खासदार बाळ्या मामा सागर बंगल्यावर; फडणवीसांच्या भेटी मागचं धक्कादायक कारण समोर

शरद पवारांचे खासदार बाळ्या मामा सागर बंगल्यावर; फडणवीसांच्या भेटी मागचं धक्कादायक कारण समोर

524 0

राज्यात पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्या आधी मुंबई सह दिल्लीतही मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अशाच वेगवान घडामोडी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर देखील घडत आहेत. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि काही अपक्ष आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची भेट घेतली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बाळ्या मामा म्हात्रे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. त्यांनी फडणवीस यांची भेट ही घेतली. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती, असं भेटीनंतर सांगण्यात आलं. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं, हे अद्यापही स्पष्ट नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

रोहित पवारांची प्रतिक्रिया

बाळ्या मामा म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत आमदार रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘बाळ्या मामा यांच्या भिवंडी मतदारसंघात गुन्हेगारी वाढली असेल म्हणून ते फडणवीसांना भेटले असतील. याव्यतिरिक्त आमचे आमदार कुणाच्याही संपर्कात नाहीत. त्यांनी तसं काही केल्यास ते लोकांना आवडणारही नाही’, असं रोहित पवार म्हणाले,

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!