'मेटा' चा मोठा निर्णय; किशोरवयीन मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी

META: ‘मेटा’ चा मोठा निर्णय; किशोरवयीन मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी

762 0

META इंस्टाग्रामवरील किशोरवयीन वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी ‘मेटा’ या आधीपासूनच अनेक उपाययोजना घेत आहे.

‘मेटा’ने इंस्टाग्रामवरील किशोरवयीन वापरकर्त्यांसाठी सुरक्षा उपायांमध्ये वाढ करण्याची माहिती दिली.

‘मेटा’ प्लेटफॉर्म्सने 8 एप्रिल 2025 रोजी ही घोषणा केली आहे.

 

कंपनीने सप्टेंबर 2925 मध्ये किशोरवयीन खात्यांची सुरुवात केली होती, ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांची ऑनलाइन गतिविधी अधिक प्रभावीपणे निरीक्षण करण्याची संधी मिळते.

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तरुणांच्या जीवनावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांवर वाढती चिंता लक्षात घेता, ‘मेटा’ ही नवीन सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करत आहे.

संशयित अश्लील छायाचित्रे डायरेक्ट मेसेजेसमध्ये शोधून काढण्यासाठी देखील पालकांची अनुमती आवश्यक होईल, असे ‘मेटा’ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले.

किशोरवयीन खाती डीफॉल्टनं प्रायव्हेट ठेवणे, अनोळखी व्यक्तीकडून खासगी मेसेजेसला ब्लॉक करणे, हिंसात्मक व्हिडीओसारख्या संवेदनशील सामग्रीवरील कडक निर्बंध, 60 मिनिटांनी अॅप वापरण्याची सूचना आणि झोपेच्या वेळी सूचनांचे थांबवण्याचे नियम.
सप्टेंबर 2025 मध्ये किशोरवयीन अकाऊंट साठीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून, कमीत कमी 54 दशलक्ष किशोरवयीन खात्यांची स्थापना झाली आहे, असे मेटाने सांगितले. या बदलांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरच्या किशोरवयीन वापरकर्त्यांसाठी डिजिटल सुरक्षितता आणखी मजबूत होईल.

Share This News
error: Content is protected !!