Beed:

पुण्यातील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर रेड; लाखोंची कॅश आणि 60 जण ताब्यात

551 0

पुण्यातील मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदू नाईक याच्या शुक्रवार पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल रात्री धाड टाकून साठ जणांना ताब्यात घेतलं आहे.

शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालय येथे हा जुगार अड्डा सुरू होता. नंदू नाईक हा मटका किंग म्हणून प्रसिद्ध असून त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डे आहेत. याबाबत पोलिसांना देखील माहिती आहे. पोलिसांनी अनेकदा अशाच पद्धतीच्या धाडी टाकल्या आहेत. मात्र पुन्हा ते अड्डे सुरू होतात. तसाच प्रकार या प्रकरणात देखील घडला.

शुक्रवारी पोलिसांनी शुक्रवार पेठेतील ज्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्याच जुगार अड्ड्यावर ऑगस्टमध्ये धाड टाकली होती. तेव्हा जुगाराच्या साहित्यासह 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर काही दिवस हा अड्डा बंद होता. मात्र काही दिवसांपासून पुन्हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. व पोलिसांनी पुन्हा धाड टाकून 1 लाख 250 रुपयांची रोकड, 47 मोबाईल आणि जुगाराच्या साहित्यासह 60 जणांना ताब्यात घेतलं आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथके, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक आणि युनिट 1 व 5 च्या पथकाने केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!