Breaking News

दुबईतील इमारतीला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू

2120 0

दुबईतील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत चार भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईच्या अल रास भागातील एका निवासी इमारतीत शनिवारी पहाटे 12.30 वाजता आग लागली.

मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील वेंगारामध्ये राहणारे 38 वर्षीय रिजेश आणि त्यांची 32 वर्षीय पत्नी जिशी, तसेच तामिळनाडूचे रहिवासी अब्दुल कादर आणि सलियाकुंड आहेत. सरकारी-संलग्न वृत्तपत्र ‘द नॅशनल’ने दुबई मीडिया ऑफिसद्वारे प्रदान केलेल्या ‘दुबई सिव्हिल डिफेन्स’ च्या निवेदनाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या आगीच्या घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. शनिवारी दुबईच्या अल रास भागात आग लागली. येथे दुबईचे मसाले बाजार भरते, जे दुबई खाडीजवळ पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे.

 

Share This News
error: Content is protected !!