MANOJ JARANGE PATIL : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचं (MANOJ JARANGE PATIL) मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर आता एक मोठी घडामोडी समोर आलीये. मराठा बांधवांना दिलासा देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय
TOP NEWS MARATHI :SPEED NEWS : AFTERNOON महाराष्ट्र टॉप न्यूज मराठी बुलेटिन
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र (MANOJ JARANGE PATIL) व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनाने दिनांक 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय वंशावळ समितीला उच्चस्तरीय समितीच्या मुदत वाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार आता समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आलाय. या समितीला 25 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयातील सर्व तरतुदींना लागू राहतील असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे आता मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
MARATHA ARAKSHAN : 2024 ला आंदोलन झालंच होतं की..! मनोज जारांगे-पाटील पुन्हा मैदानात का?
मात्र असं असतांना दुसरीकडे मराठा बांधवांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरूच असून आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक आणि जरांगे-पाटील ठाम आहेत. आता सरकार मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करणार का? की हेआंदोलन सुरूच राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.