दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

98 0

रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात आली. आज यापैकी 38 जणांना शिक्षा सुनावण्यात आली अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठं प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.

Share This News

Related Post

विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन

Posted by - February 17, 2022 0
मुंबई- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मिळाला असून त्याची जेलमधून…

ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्त्या ; दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन

Posted by - March 10, 2022 0
देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेऱ्यांचे कल पाहाता भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी…

पुणे महापालिकेतील स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्चला

Posted by - February 18, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत…

#CRIME : पत्नीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या आईने दिलेल्या 44 लाखांची करवली चोरी; असा झाला उलगडा, मुंबईतील विचित्र घटना

Posted by - February 25, 2023 0
मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 22 फेब्रुवारी रोजी भुलेश्वरला गेले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *