KISHOR BHEGADE VIRAL VIDEO:  पुण्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीत अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला.

KISHOR BHEGADE VIRAL VIDEO: शुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलांवर दादागिरी करणारा किशोर भेगडे नेमका कोण?

245 0

KISHOR BHEGADE VIRAL VIDEO:  पुण्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीत अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला.

मुलासोबत किरकोळ वाद झाल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार किशोर भेगडेनं काही अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली.
या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला..

पाहूयात हा व्हिडिओ आणि किशोर भेगडे (KISHOR BHEGADE) नेमका कोण आहे?
VIDEO NEWS: JAMMU KASHMIR MP ABDUL RASHID SPEECH: जम्मू-काश्मीरमधून निवडून आलेले खासदार काय म्हणाले ?

श्वेता शिशिर शालिनी यांची दोन मुले व त्यांच्या वर्गातील इतर मुले-मुली यांची लोढा बेलमाँदो सोसायटीतील क्लब हाउसमध्ये पार्टी होती.

या पार्टीमध्ये किशोर भेगडे यांचा 14 वर्षीय मुलगा आदित्य याला येण्यास नकार दिला. त्यावरून आदित्य याने हा प्रकार वडील किशोर भेगडे यांना सांगितला.
संतापलेल्या भेगडे यांनी आपल्या मुलाला पार्टीत येण्यासाठी नकार देणाऱ्या दोन्ही मुलांना क्लब हाउसमधून बाहेर पडण्यास मज्जाव केला.

जबरदस्तीने अडवून ठेवले. मारहाण केली. तसेच या मुलांचा गळा आवळला.

‘मी कोण आहे, तुला माहिती नाही, तुझ्या बापाला बोलव, तुला आज जिवंत ठेवत नाही,’ अशी धमकी दिली.

फिर्यादी श्वेता शिशिर शालिनी यांचा मुलगा लक्षच्या छाती, पोटावर बुक्क्यांनी बेदम आणि अमानुष मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या मारहाणीत लक्ष गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह
या अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी किशोर भेगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे..

त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली..

हाच किशोर भेगडे हा तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा माजी उपनगराध्यक्ष आहे.

SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा

त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत.
हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

त्याच बरोबर किशोर भेगडे हा कुख्यात गुन्हेगार बापू भेगड्याचा पुतण्या असल्याचं समोर आलं आहे.

ज्या प्रकरणी आता तपासात कोणकोणत्या धक्कादायक बाबी पुढे येतात ते पाहणार आता महत्त्वाचा असणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!