Khed Shivapur Volvo Bus Fire: A bus caught fire on Pune - Satara highway, some passengers injured

Khed Shivapur Volvo Bus Fire: पुणे – सातारा हायवेवर एका बसला आग, काही प्रवासी जखमी

480 0

Khed Shivapur Volvo Bus Fire: पुणे – सातारा हायवेवर वॉल्वो येथे आज दुपारी खेड शिवापुरजवळ एका बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही बस कोल्हापूरवरून पुण्याला निघाली होती. या खासगी व्हॉल्वो बसने कात्रज शिंदेवाडी पुलाजवळ अचानक पेट घेतला. मात्र मोठी जीवितहानी टळली आहे. सगळे प्रवासी सुखरूप आहेत.

Khed Shivapur AC Bus Fire: Volvo AC Bus Catches Fire On Pune-Satara Highway

अधिकच्या माहितीनुसार, बस शिंदेवाडी पुलाजवळ आली. यावेळी इंजिन भागातून धुर निघू लागला. आणि काही क्षणातच आगीचा भडका उडाला. मात्र, बस चालकाच्या सावधानीमुळे मोठी जीवितहानी टाकली. बस चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढले.

आग लागल्यास घटनेवेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. या दरम्यान काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यास अचानक काही प्रवासी जीव वाचवण्यासाठी बसमधून उद्या मारल्या. या वेळी घटनेस्थळी मोठी गर्दी जमा झाली होती.

बस ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे घटनास्थळी धाव घेतली. आणि आग आटोक्यात आणली. बस च्या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

crime news : धक्कादायक! सांगलीत पैश्याच्या वादातून खून, दोघांना अटक

Share This News
error: Content is protected !!