KALYANI NAGAR DOG NEWS: पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका पाळीव श्वानाचा आंघोळीनंतर मृत्यू झाल्याने मोठी खळबळ (KALYANI NAGAR DOG NEWS) उडाली आहे. या प्रकरणात पेटशॉप मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
DHULE NEWS: धुळे जिल्ह्यात छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; व्हिडिओमुळे १४ जणांवर गुन्हा दाखल
कल्याणी नगरमधील वेटीक नावाच्या नामांकित पेटशॉपमध्ये ही घटना घडली. वडगाव शेरी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने तिच्या ‘डॅश’ नावाच्या लाडक्या श्वानाची आंघोळ करण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी या पेटशॉपमध्ये नेमणूक केली होती. मात्र, आंघोळीनंतर काही वेळातच श्वानाला सतत उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
NILESH GHAIWAL CONNECTION WITH DRUGS RACKET: निलेश घायवळ गॅंगचा ड्रग्स रॅकेटशी संबंध ?
या अनपेक्षित घटनेनंतर डॅशच्या मालकीणीनं येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पेटशॉपमधील निष्काळजीपणाबाबत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, पेटशॉपचे मालक इस्माईल शेख (KALYANI NAGAR DOG NEWS) आणि दोन कर्मचारी – राज उर्फ प्रदीप दास यांनी श्वानाच्या आंघोळीदरम्यान योग्य काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली. तिने आरोप केला की चुकीच्या उत्पादनांचा वापर किंवा आक्रमक पद्धतीने आंघोळ घालण्यात आल्यामुळे श्वानाला त्रास झाला आणि त्याचा मृत्यू ओढवला.
या तक्रारीच्या आधारे येरवडा पोलिसांनी प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. पाटील करत आहेत. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब यांचा आढावा घेतला जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर शहरातील अनेक प्राणीप्रेमी आणि NGOs नी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम बनवावेत, पेटशॉप्सना लायसन्स देताना (KALYANI NAGAR DOG NEWS) प्रशिक्षित कर्मचारी अनिवार्य करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. डॅशच्या मृत्यूनंतर पुण्यातील प्राणीप्रेमी समुदायात हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.