ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊर गावातील आदिवासी बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढला आहे. मूलभूत सुविधा मिळण्यासाठी चार हजार आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
ठाण्यातल्या येऊर गावातील चार हजार आदिवासी बांधवांचा मोर्चा लक्षवेधी संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. वन हक्क संरक्षण प्रमाणपत्र आणि आदिवासी बांधव मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर आक्रमक झाले आहेत.