जैन सकल (एबीपीपीपी) संघातर्फे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

जैन सकल (एबीपीपीपी) संघातर्फे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

191 0

पुणे, ता. ७ – रामनवमी, जागतिक आरोग्य दिन आणि भगवान महावीर जन्मकल्याणक या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPP ) यांच्यातर्फे रविवार, ६ एप्रिल २५, रोजी बाणेर येथील माऊली गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सर्व धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 811 रक्तदात्यांनी रक्तदान करुन एक लक्षणीय प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे आयोजनास रक्त दात्यांनी मोठा प्रतिसाद दिला. याबद्दल रक्तदान शिबाराचे मुख्य संयोजक सचिन नहार यांनी आनंद व समाधान व्यक्त केल .

या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी जैन सकल संघाचे सुनील नहार, सचिन नहार, रविंद्र लुंकड, नितीन बांठिया, दीपक बांठिया, अमित संचेती, संतोष शिंगवी, कुणाल चोरडिया, आदित्य गादिया, धीरज कोठारी, आनंद कांकरीया, भारत बोरा, नितीन जैन, पारस कटारिया आणि सर्व औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ ( ABBPP ) यांनी व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

तसेच या रक्तदान शिबिराला पुणे जैन सकल संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, विलास राठोड, अनिल नहार, मनोज छाजेड, ललित जैन, श्री. सुभाष ललवानी, सागर सांकला, रवी जैन, व क्रस्ना डायग्नोस्टिकचे चेअरमन राजेंद्र मुथा, इंदर छाजेड, लक्ष्मीकांत खाबिया आणि गौतम निधी फाऊंडेशन तर्फे महावीर नहार, गौतम नाबरिया, नितीन संकलेचा, महावीर चोरडिया, सिद्धार्थ भटेवरा यांनी आपली उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

उपाध्याय प्रवर, अर्हम विज्जा प्रणेता प.पू. प्रविणऋषीजी म. सा. हे नहार कुटुंबियांचे प्रेरणास्थान असल्यामुळे संयोजकांना प्रेरित करुन आवश्यक पाठबळ देण्याचे काम प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री सुनील व श्री सचिन नहार यांनी केले.

या भव्य रक्तदान शिबिराला आमदार सिद्धार्थ शिरोळे, अभय छाजेड, अमोल बालवडकर, सनी निम्हण, आणि आदी मान्यवरांनी देखील भेट देवून रक्तदात्यांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

Share This News
error: Content is protected !!