MUMBAI SCHOOL HOLIDAY; भारतीय हवामान खात्याकडून उद्या मंगळवार,
दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे)
अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय,
खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे.
दरम्यान, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व
अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या
मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.