Hinjewadi IT Company Employee Harassment: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित आयटी कंपनीने (Hinjewadi IT Company Employee Harassment) आपल्या कर्मचाऱ्यांना बैठकीच्या खोलीत जबरदस्तीने तासन्तास डांबून ठेवत त्यांच्याकडून दबावाखाली राजीनामे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
काही कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे मीटिंगसाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर तीन ते चार तास बंद (Hinjewadi IT Company Employee Harassment) खोलीत ठेवण्यात आले. त्या काळात त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले की, “स्वेच्छेने राजीनामा द्या, अन्यथा तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल. पुढे कुठल्याही कंपनीत तुम्हाला नोकरी मिळणार नाही,” अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या.
NASHIK NEWS: फ्लॅटच्या वादातून हत्या! गुरुद्वाऱ्यातून परतणाऱ्या व्यक्तीचा चोपरने निर्घृण खून
यात काही कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिवीगाळ आणि मानसिक छळाचा आरोप देखील केला आहे. या प्रकारामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये (Hinjewadi IT Company Employee Harassment) भीतीचं वातावरण पसरलं असून अनेकांनी अजूनही यावर उघडपणे बोलण्यास नकार दिला आहे.
या प्रकारानंतर “पुरण फॉर आयटी एम्प्लॉईज” या संघटनेसह इतर आयटी कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कंपनीतील अधिकाऱ्यांनी कर्मचारी डांबून ठेवले व धमकावले असेल, तर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी.”
कंपन्यांनी अलीकडे आर्थिक कारणे देत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे, परंतु या प्रक्रिया मानवतावादी आणि कायदेशीर पद्धतीने पार पाडणे अपेक्षित आहे. अशी सक्ती आणि मानसिक छळ हा कामगार हक्कांचा स्पष्ट भंग आहे.
कामगार संघटनांनी याप्रकरणी श्रम आयुक्त आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.