Google New Update

मोठी बातमी! गुगल करणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

690 0

Google New Update:  आपण गुगलवर काही सर्च केले की google वरती गुगल ऍड्रेस बार सर्च ‘गुगल .को.इन ‘ (Google.co.in) असे येत असत आता गुगलच्या या नवीन अपडेट मुळे पूर्ण जगभरातील सर्च बार मध्ये गुगल डॉट इन(Google.in.Com) एवढेच दिसणार आहे. कारण गुगलने नवीन अपडेट मध्ये लोकल डोमेन व कंट्री कोड ( No Local domain and country code)हटवण्याचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाने काही बदल होणार नसून फक्त सर्च बार(Search bar)मध्ये तुम्ही कोणत्याही कंट्री ची कोड लींक टाकल तरी ते डायरेक्ट गुगल डॉट कॉम वर रिडायरेक्ट होइल. या मध्ये काही घाबरून जाण्याचे कारण नाही तर ही नवीन अपडेट आहे.पंरतु ही नवीन अपडेट होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.(It will take a few months)असे गुगल ने सांगितले आहे.यादरम्यान गुगलने यूजर्सला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.( Google has advised users to be Aware) या कालावधीमध्ये फ्रॉड होऊ शकतात त्यामुळे युजरने याचे गांभीर्य राखावे लागेल.(Google New Update)

Pune : पुणे – सातारा हायवेवर एका बसला आग, काही प्रवासी जखमी

यापूर्वी यूजरने कोणत्याही देशातून काही सर्च केले तर गुगल त्याला त्याच्या देशातील माहिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती पूरवीत होता. २०१७ पासून ही सुविधा सुरू झाली होती. ती बंद करण्यात येणार आहे तरी या बदलामुळे तुम्ही सर्च केलेल्या डाटा मध्ये काही बदल होणार नाही आहेत. तुमच्या सर्च डेटावर याचा काही परिणाम होणार नाही परंतु ही नवीन अपडेट आल्यानंतर युजर्स ला त्यांच्या गुगलमध्ये काही नवीन सेटिंग करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. ज्यामध्ये काही सामान्य सेटिंग्स परत सेट करावे लागणार आहेत.

*TOP NEWS MARATHI : निर्धार मेळाव्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील भाषणावरून दोन्ही शिवसेना आमने-सामने; अंबादास दानवे LIVE

तुमच्या गुगल अकाउंट मध्ये तुमचा देश तुमच्या वापरातील भाषा या सेटिंग करायला लागणार आहेत. तसेच यानंतर तुम्हाला तुमच्या आसपासचा डेटा उपलब्ध होऊ शकणार आहे. काही महिन्यानंतर जर तुम्हाला युआरएल मध्ये ‘गुगल डॉट इन ‘नाही आले तर घाबरून जाऊ नये. ती वेबसाईट स्पूफिंग नसणार परंतु त्यावर ती पूर्णपणे विश्वासही ठेवू नये कारण या अपडेटचा फायदा घेऊन तुमच्या सोबत फ्रॉडही होऊ शकतो अशी माहिती गुगलने दिली आहे.(Google New Update)

 

Share This News
error: Content is protected !!