खुशखबर ! PMPML मध्ये नोकरीची संधी ; 2 हजार चालक व वाहकांची होणार भरती

414 0

पुणे : पुणे शहरातील बेरोजगार तरुणांसाठी फायद्याची बातमी आहे. पीएमपीएमएल प्रशासनाकडून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पीएमपीएमएल प्रशासन लवकरच 2 हजार चालक आणि वाहकांची भरती करणार आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाकडे सध्या वाहकांची कमतरता आहे.त्यामुळं 2 हजार बदली, हंगामी, रोजंदारी पद्धतीने कंडक्टरची भरती करणार आहे. पीएमपीत वाहकांची मोठी कमतरता असल्यामुळे त्यांच्याकडील चालकांना वाहक बनवले आहे.याच पार्श्वभूमीवर पीएमपीकडून आगामी काळात २ हजार चालक-वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपी आता लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे.

यामुळे शहरातील २ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.वाहक भरती प्रक्रियेसंदर्भात पीएमपी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असून, नागरिकांना याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भरतीसंदर्भात कोणत्याही एजंट अथवा काम करून देतो, असं सांगणाऱ्या व्यक्तीला भेटू नये किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली.

Share This News
error: Content is protected !!