पतीच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलात जेवायला गेलेल्या विवाहितेवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार (व्हिडिओ)

1137 0

पुणे- पतीसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या गेलेल्या विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर गँग रेप केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना यवत पोलीस ठाण्याचा हद्दीत ही घटना घडली असून आरोपीना यवत पोलिसांनी 24तासात गजाआड केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, आपल्या पतीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी दौंड तालुक्यातील यवत येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असं खोटं सांगून आरोपींनी तिला पळवून नेलं.

महिलेला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले. त्यानंतर दौंड तालुक्यातील खोर गावामध्ये इनामटेकडी परिसरातील खिंडीची वाडी भागात तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर पाच आरोपींनी सामूहिक बलात्कार केला असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पीडितेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी 24 तासात 5 आरोपीना अटक केली आहे. यवत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

पाकिस्तान : कराचीमध्ये पोलीस मुख्यालयावर हल्ला; पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये अंदाधुंद गोळीबार, “पाकिस्तान दहशतवादाला मुळातून संपवेल..!”

Posted by - February 18, 2023 0
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये एका मशिदीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये 100 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता…
Cyrus Poonawalla

Cyrus Poonawalla : सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

Posted by - November 17, 2023 0
पुणे : उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…
Shinde Fadanvis

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील? ‘या’ नेत्यांची लागणार मंत्रीपदी वर्णी

Posted by - May 19, 2023 0
मुंबई : सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय सुप्रीम कोर्टात झाल्यानंतर, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे पुढच्या निवडणुकांपर्यंत स्थिर…

पुणे : प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - October 15, 2022 0
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *