पुण्याचे माजी महापौर उल्हास ढोले यांचं निधन

401 0

महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास ढोले यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले.

आज दुपारी ३ वाजता कैलास स्मशानभूमी, पुणे आरटीओ कार्यालयाजवळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . उल्हास ढोले पाटील यांच्या निधनाने पुणे शहरातील एक जुने जाणते व अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

उल्हास उर्फ नाना ढोले पाटील हे घरोघरी दूध टाकणारे महापौर म्हणून प्रसिद्ध होते. ते सलग सहा वेळा सहा वेगवेगळ्या चिन्हांवर नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकले होते.

Share This News
error: Content is protected !!