बीड जिल्ह्यातील कळंबमधील महिलेचा मृतदेह चार दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता. संबंधित महिला ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. या मृतदेहाबद्दलची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मनिषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले, आणि उस्मान गुलाब सय्यद या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
याप्रकरणी मिळालेली धक्कादायक माहिती अशी की महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहा सोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला, अशी थरारक माहिती समोर आलीय मृतदेहाशेजारी बसूनच त्यांन जेवणही केलं.
मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती आरोपींनी पोलीस जबाबदातून समोर आलंय