सुपरफास्ट

गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री DEVENDRA FADANVIS ॲक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

DEVENDRA FADANVIS: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट-किल्ल्यांना वेढलेल्या अतिक्रमणांवर आता राज्य सरकारचा हातोडा पडणार आहे.

गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून,

जानेवारीअखेर प्रत्येक किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमणांची माहिती संकलित केली जाईल.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कठोर पावलं उचलत 31 मे पर्यंत सर्व गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश या समितीला दिले आहेत.

1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची नेमणूक देखील करण्यात आली आहे.