विष्णु महाराज चक्रांकित यांचे निधन

3865 0

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी श्री विष्णु महाराज चक्रांकित यांचे आळंदी येथे रविवारी वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले .आज(सोमवारी) सकाळी अकरा वाजता इंद्रायणी तीरावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपुढे सलग पन्नास वर्ष त्यांनी हरिपाठ कीर्तन सेवा केली. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सुवर्णाक्षरात तयार केले . आणि ते भारताचे तत्कालीन राष्ट्रपती पंडित शंकर दयाळ शर्मा यांच्या शुभहस्ते प्रकाशित करून श्री माऊलींच्या मंदिरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली.

Share This News
error: Content is protected !!