अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटप ठरलं; शिवसेना ठाकरे 21 जागांवर लढणार

2389 0

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालं असून सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढाही सुटला आहे.

21 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 17 जागा काँग्रेस तर 10 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार निवडणूक लढणार आहेत.

सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील तर भिवंडीच्या जागेवर बाळ्या मामा म्हात्रे हे उमेदवार असणार आहेत. विकास आघाडीमध्ये कोणतीही मतभिन्नता नसून आम्ही सर्व एक आहोत असं विधान यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!