काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

204 0

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण महाविकास आघाडी सरकारी ज्या मुद्यावरुन स्थापन झाले त्यांचे काय झाले, असा सवाल कॉग्रेसने उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीत  सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. याचं कारण कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र. आघाडी सरकारच्या घटक पक्ष असलेल्या कॉग्रेसने मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!