पुणेब्रेकिंग न्यूजसुपरफास्ट

पुणेकरांसाठी खुशखबर! सीएनजी 6 रुपयांनी स्वस्त

पुणे: सीएनजी वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आली असून सीएनजीच्या किमतीत तब्बल 6 रुपयांची घट झाली आहे. 

आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार असून आता पुण्यात 86 रुपये प्रतिकिलोनं सीएनजी  मिळणार आहे. महागाईनं होरपळलेल्या वाहनचालकांना यामुळं दिलासा मिळाला आहे.