मुंबई:- सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. या जयंती निमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” व त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला "सामाजिक न्याय दिन" व त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. pic.twitter.com/cyx6Kp7ehu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2022