मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या घेणार अमित शहा यांची भेट; कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या उपस्थितीची शक्यता

322 0

नवी दिल्ली : राज्यात सध्या अनेक वादाचे विषय सुरू आहेत. अंतर्गत राजकारण तापलेले असतानाच सीमावाद हा देखील मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावादावर ही महत्त्वाची बैठक होणार असून या चर्चेच्या शेवटी काय तोडगा निघतो याकडेच दोन्ही राज्यांच्या आणि विशेष करून सीमेवरील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!