चेंढरे ग्रामपंचायत झाली हायटेक; ऑनलाईन करप्रणाली सुरु करणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

765 0

बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतीचा कारभार देखील हायटेक झाला आहे. ग्रामपंचायतीत देखील नवे प्रयोग सध्या राबवले जात आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, याकरता रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे.

ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाईन सुविधा दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. चेंढरे ग्रामपंचायत ऑनलाईन सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे.

‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’द्वारे हे काम पूर्ण होणार असून, पारदर्शकता येणार आहे. प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करून त्यांचे क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. पाणीपट्टी व घरपट्टीचे मापन त्याद्वारे कार्यान्वित करणारी चेंढरे ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!