आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी जागावाटपावरून मोठी रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये अनेक जागांवर रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच आता महाराष्ट्रातील एका मतदारसंघांमध्ये भाऊ आमदार असलेल्या मतदारसंघावर बहिणीनेच दावा सांगितलेल्यांनं कुटुंबामध्ये संघर्ष उभा राहिलाय.
एकाच पक्षातील दोन भाऊ बहिणींनी एकाच मतदारसंघावर दावा सांगितल्याने उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची असा पेच पक्षासमोर उभा राहिलाय.
तेच उभा राहिलाय तो वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे रणजीत कांबळे हे आमदार आहेत. मात्र याच मतदारसंघावर चारुशिला टोकस यांनी दावा सांगितलं चारुशीला या रणजीत कांबळे यांच्या सख्या मावस बहिण आहेत. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून महिला काँग्रेसचे अध्यक्ष पदही त्यांनी सांभाळलं आहे.
1999 पासून सलग रणजीत कांबळे हे या मतदार संघातून आमदार म्हणून विजयी होत असून त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलंय