पुणे (PUNE)महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघारीचा टप्पा पूर्ण झाला असून, त्यानंतर सिंहगड रोड(SINHAGAD ROAD) परिसरात भाजपला मोठे यश मिळाले आहे.
प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी–माणिक बाग) येथून भाजपच्या(BJP) मंजुषा नागपुरे(MANJUSHA NAGPURE )या कोणताही विरोध न होता बिनविरोध निवडून आल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा त्या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या आणि यावेळीही त्या निवडून आल्या.
तसेच, प्रभाग ३५ ‘ड’ (सर्वसाधारण) गटातून भाजपचे उमेदवार श्रीकांत शशिकांत जगताप( SHREEKANT JAGTAP) यांचा देखील बिनविरोध विजय निश्चित झाला. त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड(NITIN GAIKWAD) यांनी अर्ज माघारी घेतला.अर्ज माघारीनंतर सिंहगड रोड भागात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे या बिनविरोध निवडींमधून दिसून येत आहे.