मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना कोरोनाची लागण

228 0

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड सुरू असताना आता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे

गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!